प्रारूप विकास आराखडा २०२५ मधील मौजे डोंगरी येथे मेट्रो कारशेड आरक्षणाविरुद्ध हरकत
प्रति,
मा. आयुक्त तथा प्रशासक,
मिरा-भाईंदर महानगरपालिका,
इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईंदर (प), ठाणे – ४०११०१.
विषय:प्रारूप विकास आराखडा २०२५ मधील मौजे डोंगरी येथे मेट्रो कारशेड आरक्षणाविरुद्ध हरकत.
महोदय,
मी, खाली सही करणारा/करणारी, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी आणि पर्यावरण-जागरूक नागरिक म्हणून, प्रारूप विकास आराखड्यात प्रस्तावित मेट्रो कारशेड आरक्षणाविरुद्ध तीव्र हरकत नोंदवित आहे.
मौजे डोंगरी परिसर हा मिरा-भाईंदरचा हरित फुफ्फुस असून येथे विविध प्रकारच्या पक्षी, प्राणी व वनस्पतींचे नैसर्गिक अधिवास आहेत. येथे कारशेड बांधण्याचा प्रस्ताव फक्त पर्यावरणीय विध्वंसक नाही तर स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर, पाण्याच्या स्त्रोतांवर व हवामानाच्या गुणवत्तेवरही गंभीर परिणाम करणारा आहे.
या ठिकाणी कोणताही Environmental Impact Assessment (EIA) किंवा Social Impact Assessment (SIA) अहवाल तयार केलेला नाही. Environment (Protection) Act, 1986, Wildlife Protection Act, 1972, तसेच Forest (Conservation) Act, 1980 यांचे तरतुदींचा विचार न करता असा आरक्षण प्रस्तावित करणे पूर्णपणे बेकायदेशीर व जनहितविरोधी आहे.
या आरक्षणामुळे डोंगरी, मोर्वा, तारोडी, पाली, उत्तन व इतर किनारी गावे यांच्या जीवनमानावर आणि पारंपरिक उपजीविकांवर (मच्छीमार, शेती, इको-टुरिझम) प्रतिकूल परिणाम होईल. ही केवळ जमीन नाही — ही आपल्या ओळखीची आणि संस्कृतीची मुळ जागा आहे. तरी मी विनंती करतो/करते:
- प्रारूप विकास आराखड्यातील मेट्रो कारशेड आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे.
- या विषयावर सार्वजनिक सुनावणी आयोजित करून स्थानिकांचे मत ऐकले जावे.
आपला नम्र,


As Metro car shed is going to be done on the proposed site which is an environment disaster
ReplyDelete