मिरा भाईदर शहरातील प्रभाग २४ येथे लिचीट युक्त पाण्यामधून नागरिकांना - विद्यार्थाना पालिकेच्या चुकीच्या कामामुळे चालत जावे लागत असल्याची नोंद घेऊन सदर बाबतीत पालिका प्रशासनास योग्य ते निर्देश देणेबाबत.
दि. ०९ मे २०२१
प्रती,
मा. अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोग,
९, हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या समोर,
मुंबई ४००००१.
विषय : मिरा भाईदर शहरातील प्रभाग २४ येथे लिचीट युक्त पाण्यामधून नागरिकांना - विद्यार्थाना पालिकेच्या चुकीच्या कामामुळे चालत जावे लागत असल्याची नोंद घेऊन सदर बाबतीत पालिका प्रशासनास योग्य ते निर्देश देणेबाबत.
महोदय,
मिरा भाईदर महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २४ मध्ये देवतलाव – मोठागाव सीमा रेषेवरील खाडीच्या पुलावर पावसाळ्यात व इतर वेळीही पाणी साचत असून पालिके च्या बांधकाम विभाग व स्वस्वच्छता विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. खाडी वरील ह्या पुलावर फुटपाथही नसून साचलेल्या पाण्यातूनच नागरिकांना चालत जावे लागत आहे. गेल्या वर्षी देवतलाव पुलावर नवीन जलवाहिनी अयोग्य पणे टाकल्यामुळे पावसाळ्यातील पाणी रस्त्यात साचत असून पायी चालणाऱ्या नागरिकांस ह्या साचलेल्या पाण्यामुळे गैरसोय झाली होती. सदर खाडी पुलाच्या शेजारी पालिकेचा कचरा डेपो आहे. पावसामुळे ह्या ठिकाणी कचऱ्यातून निघणारे घाण पाणी - लिचीट मुख्य रस्त्यावर साचेलेल्या पाण्यात जाऊन मिळत असेत व ह्या लिचीट मिश्रित पाण्यातून नागरिकांना, शाळेतील मुलांना जावे लागते हि फार शरमेची व आरोग्यघातक बाब आहे. नागरिकांनी स्वच्छ वातावरणात राहणे - वावरणे ह्या घटनेने दिलेल्या मुलभूत मानव अधिकाराचा अवमान आहे. म्हणून
१. अशी जलवाहिनी पालिकेने - कंत्राटदाराने रस्त्यावर टाकणे हे कोणत्याही नियमात मोडत नसून हे काम अत्यंत बेजबाबदारपणे करण्यात आले असल्यामुळे साचणाऱ्या पाण्यासाठी व बेजबाबदार पणाच्या कामासाठी सबंधित ठेकेदार व पालिका अधिकारी ह्यांना दोषी धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी करण्यात यावी हि विनंती (९ जून २०२१ रोजी मिरा भाईदर महानगरपालिका आयुक्त कार्यालयास सदर बाबतीत तक्रार केली असून पालिकेच्या माध्यमातून कुठलीच ठोस कारवाई झाली नाही. म्हणून आजही सदर ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर आहे.)
२. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठीची सुयोग्य व्यवस्था.
३. पुलाच्या दोन्ही बाजूस उभारण्यात आलेली संरक्षक ग्रील काही प्रमाणात उखडलेली असून त्याची दुरुस्ती करण.
४. पुलाशेजारी उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा जमा करण्यासाठी ट्रॉली ची व्यवस्था करणे. ई
महत्वाची सुचवलेली कामे युद्ध पातळीवर करणे कामी सबंधितांना निर्देश द्यावेत ही विनंती.
आपला नम्र
शॉन लिओ कोलासो




Comments
Post a Comment