प्रभाग क्रमांक २४, भूतबंगला - उत्तन मार्गावर सुरु असलेल्या गटाराच्या कामाबाबत ! (04042022)
प्रभाग क्रमांक २४, भूतबंगला - उत्तन मार्गावर सुरु असलेल्या गटाराच्या कामाबाबत
मिरा भाईदर महानगर पालिका क्षेत्रातील उत्तन गावात भूतबंगला ते उत्तन ह्या मुख्य रस्त्यावर पालिकेच्या माध्यमातून मुख्य गटाराचे काम सुरु असून सदर काम होत असतना गटाराच्या मधून पाण्याचे पाईप, इलेट्रिक लाईन्स, इतर पाईल मोठ्या प्रमणात आर – पार सोडल्या असून ह्यामुळे येणाऱ्या काळात विशेष:त पावसाळ्यात गटारात मोठा कचरा साचू शकतो, व पाण्याचे पाईप, इलेट्रिक लाईन्स, इतर पाईप ह्यामुळे गटारातील सांडपाणी – पावसाचे पाणी ई चा प्रवाह अडला जातो, अशा वेळी साफ सफाई करताना पालिका सफाई कर्मचाऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागतो. म्हणून पालिकेस तशी तक्रार दाखल केली होती. पालिकेने सदर विषयी थातूर मातुर उत्तर दिले आहे. येणाऱ्या पावसाळ्यात गटार तुंबणार नाही हि आशा !!



Comments
Post a Comment