टायटल वरून, गावातील स्टोरीवरून किंवा कोणत्याही सभासदावरून गाईलेले गाणे बाद केले जाईल



इस्ट इंडियन सिंगिग कॉम्पिटीशन म्हणजे स्थानिक गाण्यांचा कार्यक्रम, लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये सामजिक एकता टिकून राहावी ह्या उद्देशाने सार्वजनिक गणेश उस्त्ववाची सुरुवात केली त्या प्रमाणे आपल्या इस्ट इंडियन समाजात एकी वाढावी, आपली संस्कृती टिकावी म्हणून सिंगिग कॉम्पिटीशन आयोजनाचा प्रारंभ झाला असावा.

हे पोस्ट केलेले कात्रण एका इस्ट इंडियन सिंगिग कॉम्पिटीशन चे आहे.

ह्यातील मजकूर वाचताना एक गोष्ट मनाला खटकली....!!

“टायटल वरून, गावातील स्टोरीवरून किंवा कोणत्याही सभासदावरून गाईलेले गाणे बाद केले जाईल”

स्थानिक गाण्यांचा / लोकगीताचा कार्यक्रम म्हणून अखंड पणे सुरु असेलेल्या ह्या परंपरेस अशी बंधने घालणे हे मनला न पाटण्या सारखे आहे. एका सिंगरला त्याच्या आवडीप्रमाने गाणे गाता यावे म्हणून प्रोस्ताहित करणे अभिप्रेत असताना अशी अनावश्यक बंधने घालून आपणा चुकाचा पायंडा पाडत आहोत ह्याचे दुख होते.

शेवटी प्रत्येक कार्यक्रमाचे नियम त्या-त्या आयोजकांच्या संमतीने ठरविलेले असतात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र वरील हि बाब प्रत्येक इस्ट इंडियन सिंगिग कॉम्पिटीशन रसिक श्रोत्याला नक्कीच खटकत आहे. !!


Comments