उतन सातपटी वादात लिओ कोलासो ह्यांची भूमिका निर्णायक .....????



सदर वादात मागे राजकारणी लिओ कोलासो ह्यांना दूर राहण्याचा ठराव कोळी जमातीत संमत करण्यात आला होता. (इतर जमातीत असा दूर राहण्याचा ठरावा कोणत्या कोणत्या - कारणासाठी मांडतात हे आपल्याला माहीत असेलच.) आता तरी जमातीमार्फत गावकीची सभा बोलवून सदर ठरारावर चर्चा अपेक्षित आहे..... बघुया जमातीच्या पदाधिका-यांत तेवढी तरी हिम्मत आहे का??
जोजफ घोन्सालविस....अगदी काही दिवसांपूर्वी आपणच लिओ केालासो विषयी ब-याच गोष्टी गावातील अडचणीत सापडलेल्या मच्छिमार बांधवांना सांगितल्या... मग आता लिओ कोलासोंची मध्यस्थी का हवी आहे.?
आपण एक भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील सभासद आहात. केंद्रात, राज्यात व शहरातही आपली  सत्ता असल्यामुळे आपण उत्तन सातपाटी कंव वादात काहीतरी चमत्कार करून लोकांना योग्य न्याय मिळवून देणार अशी माझी अपेक्षा होती.. परंतू आपण सदर बाबतीस संपूर्णपणे अयशस्वी ठरले आहात.
आज गावात काही लोक उत्तन - सातपाटी कंव वादा संर्दभात स्वाक्षरी मोहीम चालवताना दिसत आहेत. तर काही लोक गंमत बघत आहेत. प्रत्यक्षात जोजफ घोन्सालवीस व जमातीतील पदाधिका-यांनी सदर प्रश्नात झालेल्या घडामोडी हयां वेळो - वेळी सर्व मच्छिमार बांधवांना न संकोचता, न घाबरता मांडायला अपेक्षित होते. मागील मासेमारी हंगामात असलेली दुष्काळ जन्य परिस्थिती, नवीन मासेमार हंगाम सुरू होण्याचे दिवसांत 13 ऑगस्ट रोजीची पोलीसांची नोटीस असे सारे गंुतागुंतीचे वातावरण असताना आजही जोजफ घोन्सालवीस हे अपुरी माहिती देत आहेत.
मित्रांनो जमातीत घडलेली कोणतीही गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनाशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे जोडली गेलेली आहे. त्याचे चांगले - वाईट परिणाम हे समाजातील लोकांनाच सोसावे लागतात हा इतिहास आहे. आज जमातीत, इतर ठिकाणी उत्तन - सातपाटी कंव वादात मार्ग काढण्यासाठी अनेक बैठका होत आहेत. माझे जमातीतील पदाधिका-यांस न्रम निवेदन व आवाहन आहे की सदर बैठकांचे व्हिडीओ शुटींग व्दारे संकलन करावे म्हणजे गरजेच्या वेळी सदर बाबतीचा खुलासा करणे आपणासही सुलभ होऊन जाईल.
धन्यवाद !



वाघ तो वाघच असतो..!!

Comments