आप-आपसातील भेदभाव, समस्या हया शांततेच्या - समजोतेच्या मार्गाने सोडविणे समाज्याच्या..............
आपल्या
समाजासमोर उद्भवलेल्या एखादया प्रश्नात, समस्येत कोणीही राजकाण करु नये. काही दिवसांपुर्वी उत्तन-सातपाटी वादात हेच
अपेक्षित होते. परंतू सदर प्रकरणात काय-काय घडले हे सर्व गावक-यांनी प्रत्यक्ष पाहिले व अनुभवले.
दि. 17 मे रोजी समु्रदात मासेमारी करताना नेव्हिच्या
लोकांकडून जो प्रकार घडला त्याच्यातही काही ‘‘मानसिक रोगी‘‘ भोळया-भाभडया लोकांना
चिथावण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वात
(जोजफ घोन्सालविस हयांच्यानुसार महाराष्ट्र मच्छिमार कृत्री समिती... असो) सदर
प्रश्न सरकार दरबारी अधिक प्रभाविपणे मांडून आपल्या अन्यायग्रस्त मासेमार बांधवास
योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी व भविषात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून
सातपाटी-डाहणू ते करांजा पर्यंतचे कृती समिती व इतर सल्लग्न समित्यांचे कार्यकर्ते
एकजुटिने प्रयत्न करीत आहेत. उत्तन मच्छिमार वि. का. स. सो. चे चेअरमन व महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष
लिओ कोलासोंना स्वत:च्या राजकिय स्वार्थासाठी मातीत गाडणाचे स्वप्न काहीजण पाहत असून त्यांच्यावर विविध बिन बुडाचे
आरोप कराण्यात आले आहेत. मित्रानो जशी ग्रंथांची पाने
फाडल्यामुळे शब्द नष्ट होत नाहीत, धडे गाळल्यामुळे इतिहास बदलता येत नाही, पत्र फाडल्यामुळे भावना संपत नाहीत किंवा पुतळे
हलविल्यामुळे त्या व्यक्तीचे इतिहासातील योगदान संपुष्टात येत नाही त्याचप्रमाणे
हाडाच्या कार्यकत्याला कितीही बंधने लादली, कितीही आरोप केले तरी तो समाजाप्रती असलेली कळकळ, आत्मीयता व आपुलकीमुळे अशी सर्व बंधने बाजूला सारून सदैव
आपले कार्य चालू ठेवतो व “हाथी चले बजार तो कुत्ते भौके हजार” हि म्हण आपण
ऐकली असेलच.
श्री.जोजफ घोन्सालविस हे उत्तन भा.ज.पा चे आघाडीचे कार्यकर्ते
असून आज गल्ली ते दिल्ली म्हणजे शहरात, राज्यात व के्रंद्रात भा.ज.पा. चे सरकार असून केंद्रिय पेट्रोलियम मंत्रालय हे
देखिल भा.ज.पा.च्या ताब्यात आहे. ONGC हि संस्था केंद्रिय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अख्ेारीत येत
असून सर्वे बंद - चालू करण्याचे सर्व अधिकार हे सदर मंत्रालयास आहेत. सन 2014-15 चा मासेमारी हंगाम हा तसा दुष्काळजन्य परीस्थीतीचा. गेल्या
काही वर्षात ONGC चे होणारे
सर्वे हे सत्तेतील काँग्रेस व मित्रपक्षाचे विविध तेल कंपन्यांना फायदा
पोहचविण्यासाठीचे साटेलोटे, ONGC च्या सर्वेमुळे एैन मासेमारी हंगामात आपल्या
मासेमार बंधवांना अनेक प्रकारचा, आर्थिक, मानसिक त्रास झाला असून हयासाठी सत्ताधारी
काँग्रेस व मित्रपक्षच जबाबदार असे अनेक प्रकारचे विरोधकांचे आरोप. सत्ता
परीवर्तनामुळे भारतिय जनता पक्षाचे केंद्रात व राज्यात निर्वीवाद सरकार स्थापन
होउन सुमारे 1 वर्ष झाली आहेत. मग त्या वेळचे विरोधक व आत्ताचे सत्ताधारी (भारतिय जनता
पक्ष) ONGC सागरी क्षण सारख्या विषयावर आजही गप्प का ??
समुद्रात झालेला
गोळीबार, मासेमारांना होणारी मारहाण, मासेमारी क्षेत्रात होणारे सर्वेक्षण इ. गोष्टी ONGC हया संस्थेशी
प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निगडित असल्यामुळे हया पत्राव्दारे जोजफ घोन्सालविस
हयांना नम्र निवेदन व खुले आहवान करु इच्छितो की, नविन मासेमारी हंगाम सुरु होण्याआधी (आॅगस्ट - सप्टेंबर 2015 पुर्वी) आपण भा.ज.पा केंद्र - राज्य सरकारच्या माध्यमातून ONGC चे समुद्रातील
तेल सर्वे कायमचे बंद करुन सदर सर्वेमुळे मच्छिमारांस होणारा त्रास कायमचा बंद
होण्यास मदत करावी.
धन्यवाद !
|
आप-आपसातील भेदभाव, समस्या हया
शांततेच्या - समजोतेच्या मार्गाने सोडविणे समाज्याच्या विकासाच्या दृष्टीने
क्रमप्राप्त आहे. पण आज हा
अशा वृत्तीचा धिक्कार आसो !!!
(जून २०१५, उत्तन)
|

Comments
Post a Comment