उत्तन सातपाटी कव वाद... आपल्या माहितीसाठी

उत्तन सातपाटी कव वाद... आपल्या माहितीसाठी

कोळी जमातीचे नेते श्री. जोजफ घोन्सालवीस हे मिरा रोड येथे आजारानिमीत्त हॉस्पिटल मध्ये भरती होते. काही दिवस अगोदर त्यांनी माइया वडिलांना फोन करुन उत्तन सातपाटी कव वादात मध्यस्ती करण्याची विनंती केली आहे. सदर वाद हा दिवसागणिक गुंता गुंतीचा होत चालला असल्यामुळे अशी विनंती आली असावी...............

सदर प्रकरणाची पाश्वभूमी अशी की
लिओ कोलासो हे प्रत्येक वेळी समजोत्याची बाजू घेताता, आपण हया वेळी सातपाटिवाल्यांना आर चे पार करुन ठेउ. त्याप्रमाणे हया वादात राजकारणी व्यक्तिंना विषेशतः लिओ कोलासो हयांना दूर राहण्याचा ठराव व फतवा कोळी जमातीने काढला होता. मग सुरुवातीला रोहीदास पाटिल, नरेंद्र मेहता (बी.जे.पी) हयांना का बोलाविण्यात आले?? गमतीची मुद्दा असी की श्री. जोजफ घोन्सालवीस, माजी नगरसेवक हे भारतिय जनता पक्षाचे एक क्रियाशिल सभासद आहेत, मग ते राजकारणी नाहित का? व आता लिओ कोलासोची मध्यस्ती कशासाठी. अगदी काही दिवसांपुर्वी नेव्हिने केलेल्या फायरीगच्या वेळीही लिओ कोलासो व त्यांच्या सहका-यांवर अनेक बिनबुडाचे आरोप जोजफ घोन्सालवीस व इतरांमार्फत करण्यात आले. लिओ कोलासोचे राजकिय व सामाजिक स्थान संपविण्याचे व त्यांना मातीत गाडण्याचा प्रण घेतलेल्या जोजफ घोन्सालवीस हयांना अचानक लिओ कोलासोच्या मध्यस्थिची आवश्यकता का भासली आहे? उत्तन सातपाटी कव वाद गुतागुंतीचा होत चालला असून अशा वेळी गावातील लहान मोठयांनी एकत्र येउन लढले पाहिजे परंतू कोळी लोकांचे श्रध्दा्स्थान आसलेल्या संत पिटर कोळी जमातीसारख्या संस्थाने जेव्हा असे फतवे काढले तेव्हा आपणही विचार करायला हवा होता..
जमातीचे तांडेल व सर्व गावक-यांना मी आहवान करु इच्छितो की, उत्तन व सातपाटी वादत मार्ग काढण्यास जोजफ घोन्सालविस व सहकारी अयशस्वी ठरले आहेत, म्हणून जमातीची आमसभा बोलवून राजकारणी व्यक्तींना दुर ठेवण्याचा घेतलेला ठराव मोडीत काढून सर्व समावेषक कृती गट स्थापन करावा म्हणजे सदर वादात जलद व योग्य मार्ग काढता येईल.

धन्यवाद !!
-    शॉन लिओ कोलासो,
 उत्तन – देवतलाव

Comments