उत्तन - सातपाटी कंव वाद

उत्तन - सातपाटी कंव वाद......
संत पिटर कोळी जमातीने ह्या विषयात पुढाकार घेतला आहे. कोळी समाजातील प्रश्न व समस्या सोडवणे हे कोळी जमातीचे मुख्य कार्य. उत्तन -सातपाटी कंव वादात मार्ग काढताना – समजोता करताना राजकीय पक्ष, विशिष्ट ग्रूप ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून सर्वसमावेशक असे कार्य करणे अपेक्षित होते........असो !!! आज सदर प्रश्नात माझ्या वडिलांना (लिओ कोलासो) व इतर राजकीय पक्षातील (काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, भा.., शिवसेना .) कार्यकर्त्यांना  बाजूला राहण्याचा फतवा कोळी जमातीचे पदाधिकारी व मार्गदर्शक जोजफ घोन्सालवीस ह्यांनी काढल्याचे समजले. वास्तविक पाहता उद्भवलेला प्रश्न हा कोण एका ग्रूप किवा कोण एका परिवाराचा नसून तो संपूर्ण गावाचा आहे. गावातील जुने-जाणते कार्यकते, युवक वर्ग ह्यांना बरोबर घेऊन उद्भववलेली समस्या शांतीच्या मार्गाने सोडवणे क्रम प्राप्त आहे. उत्तन - सातपाटी कंव वादात कोळी जमात योग्य प्रकारे मार्ग काढील ह्यात काही शंका नाही. तथापि मी, कोळी जमातीचे पदादिकारी व विशेष: गावक-यांना लिओ कोलासो ह्यांच्या वतीने कळवू इच्छितो कि, गावक-यांवर आलेल्या कोणत्याही संकटात लिओ कोलासो, त्यांचा परिवार व कार्याकाते सदैव गावक-यांचाच सोबत आहेत व भविष्यातही असतीलच. मित्रानों आपणास नम्र निवेदन आहे की, सदर संकटाच्या काळात आपण सर्वांनी गावपाटील श्री.कलमेत पाटील व सहकाऱ्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहवे व त्यांना योग्य मदत करावी तसेच खोटया प्रचारापासून सावध राहून गावातील शांतीचे वातावरण टिकविण्यासाठी सहकार्य करावे.

धन्यवाद !!
-    शॉन लिओ कोलासो,
उत्तन – देवतलाव

Comments