घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, C&D Waste Site, STP या आरक्षणांविषयी हरकत

प्रति,
मा. आयुक्त तथा प्रशासक,
मिरा-भाईंदर महानगरपालिका,
इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईंदर (प), ठाणे – ४०११०१.

विषय: प्रारूप विकास आराखडा २०२५ मधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (Solid Waste Management Plant), तोडकाम अवशेष स्थळ (C&D Waste Site) आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) या आरक्षणांविषयी हरकत.

महोदय,

मी, खाली सही करणारा/करणारी, सदर आरक्षणांविरुद्ध हरकत नोंदवित आहे. मौजे पाली सर्वे क्र. ६० व मौजे उत्तन सर्वे क्र. २५ येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे, आणि या काळात नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या, हवा व पाणी प्रदूषण, दुर्गंधी आणि पर्यावरणीय हानी सहन करावी लागत आहे.

या विद्यमान त्रासाच्या पार्श्वभूमीवर आता नव्याने तोडकाम अवशेष स्थळ (C&D Waste Site) आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) यांची आरक्षणे दाखविण्यात आली आहेत, जी पूर्णपणे अन्यायकारक, अवैज्ञानिक आणि पर्यावरणविरोधी आहेत. एकाच ठिकाणी तीनही प्रकारचे प्रदूषणकारी प्रकल्प ठेवणे स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, उपजीविका आणि पर्यावरणावर विनाशकारी परिणाम घडवेल.

मुख्य हरकती:

  • घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२४ नुसार डोंगराळ व संवेदनशील भागात असे प्रकल्प बंदीस्त आहेत.
  • पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ तसेच हवा व पाणी प्रदूषण प्रतिबंधक कायदे यांचे उल्लंघन होत आहे.
  • भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत “स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार” भंगला जात आहे.
  • CRZ अधिसूचना, २०१९ नुसार किनारी व धार्मिक, पर्यटन क्षेत्रात प्रदूषणकारी प्रकल्पांना मनाई आहे.

तरी आमच्या भागातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, तोडकाम अवशेष स्थळ आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र ही तिन्ही आरक्षणे त्वरित रद्द करण्यात यावीत हि विनंती करतो/करते.

आपला नम्र,

सूचना: "Send Email" बटण तुमच्या डिव्हाइसच्या डिफॉल्ट मेल क्लायंटमध्ये एक नविन मेल उघडेल, आणि विषय व मजकूर स्वयंचलित भरलेले राहतील. पूर्ण तपासा आणि शेवटी पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक भरा नंतर पाठवा.

Comments