मोर्वा–पालखाडी–भाटेबंदर कोस्टल रोड आरक्षणाबाबत हरकत

प्रति,
मा. आयुक्त तथा प्रशासक,
मिरा-भाईंदर महानगरपालिका,
इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईंदर (प), ठाणे – ४०११०१.

विषय:प्रारूप विकास आराखडा २०२५ मधील मोर्वा–पालखाडी–भाटेबंदर कोस्टल रोड आरक्षणाबाबत हरकत.

संदर्भ: मनपा अधिसूचना क्र. मनपा/नर/2061/25-26 दि. 24/09/2025

महोदय,

मी, खाली सही करणारा/करणारी, प्रारूप विकास आराखड्यात नमूद केलेल्या मोर्वा–पालखाडी–भाटेबंदर कोस्टल रोड आरक्षणाविरुद्ध तीव्र हरकत नोंदवित आहे.

सदर प्रस्तावित रस्ता हा घनदाट वृक्षांनी व्यापलेल्या फळबागांमधून आणि अतिशय संवेदनशील किनारी पट्ट्यातून जातो. या परिसरात पारंपरिक मच्छिमारांची उपजीविका अस्तित्वात आहे. या भागात नैसर्गिक जलमार्ग आणि मच्छिमारांच्या नौकांचा नियमित ये-जा मार्ग आहे. या रस्त्याच्या अंमलबजावणीमुळे स्थानिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होईल तसेच पर्यावरणीय समतोल बिघडेल.

तसेच या रस्त्याचा प्रवेश (Entry) व निर्गम (Exit) बिंदू मोर्वा गावाच्या हद्दीत दिला गेल्यामुळे, स्थानिक रहिवाशांना या प्रकल्पातून कोणताही प्रत्यक्ष लाभ मिळणार नाही. उलट वाहतूक, आवाज, प्रदूषण आणि नैसर्गिक परिसराचा ऱ्हास यामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होईल.

तरी पर्यावरण, जैवविविधता आणि पारंपरिक मच्छिमारांचे जीवनमान धोक्यात आणणारा कोस्टल रोड आरक्षण तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच या विषयावर स्वतंत्र सार्वजनिक सुनावणी आयोजित करून नागरिकांना आपली मते व हरकती मांडण्याची संधी देण्यात यावी, ही नम्र विनंती.

आपला नम्र,

सूचना: "Send Email" बटण तुमच्या डिव्हाइसच्या डिफॉल्ट मेल क्लायंटमध्ये नवीन मेल उघडेल. विषय इंग्रजीत आहे आणि मजकूर पूर्णपणे मराठीत आहे. पाठवण्यापूर्वी पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक भरा.

Comments